चॉईस अँड ऑप्शन

ती गर्दी बघ…

तुझ्या प्रेमाचं दान आपल्याच कटोऱ्यात पडावं म्हणून तुझ्या पायाशी एका पायावर तत्परतेने उभी असलेली गर्दी…

तुझ्यावर मरणाऱ्यांची, तुझ्यासाठी मरायला तयार असणाऱ्यांची.

सोप्पं आहे, आता फक्त इशाऱ्याने एक ‘चॉईस’ करायची आहे तुला

पण पायांवर खिळलेली तुझी नजर उचलून एकदा समोर बघ

गर्दीपासून अलिप्त राहून दुरूनच ती गर्दी बघत एक ‘ऑप्शन’ उभा आहे.

ज्याचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, हे तुलाही माहीत आहे.

जो तुझ्यासाठी जगायला तयार आहे.

त्यानेही तुझ्या पायांखाली असावं अशी तुझी इच्छा होईल, पण तो येणार नाही.

ही स्वार्थी गर्दी पायांखाली चिरडली जाईल याची तमा न बाळगता तू तिथपर्यंत पोहचण्याचा एकदातरी प्रयत्न कर.

नाहीच जमलं…तर गर्दी आहेच!

तुझ्यापेक्षा चांगला ऑप्शन त्यांना मिळत नाही तोपर्यंत.

#मनन

One thought on “चॉईस अँड ऑप्शन

Leave a comment